किनवट: सम्राट अशोक बुद्ध विहार व वामनदादा कर्डक संगीत अकादमी गोकुंद्याच्या वतीने १५ॲागष्ट २०२३रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी रिपाईचे मराठवाडा उपाध्यक्ष दादाराव कयापाक,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,पिरीपाचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरणे, माजी प्राचार्य आर.जी.वाघमारे ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर प्रा.डॉ.पंजाब शेरे यांनी आभार मानले.कार्यक्रमानतर लगेचच महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांची संगीतमय मैफील रंगली.अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश पाटील,रुपेश मुनेश्वर, कामराज माडपेल्लीवार यांनी वामनदादा कर्डक यांची सदाबहार गीते गायली.
या संगीत मैफीलीचे सुत्रसंचलन कवी महेंद्र नरवाडे यांनी केले.संगीतसाथ प्रकाश सोनवणे, राहुल तामगाडगे व सुरज पाटील यांची होती. कार्यक्रमाला क्रांतीसूर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष रमेश मुनेश्वर,प्रा.एस.के.राऊत, सुभाष गडलिंग, अनिल उमरे,वसंत सर्पे,बंडु भाटशंकर,भारत कावळे,विनय वैरागडे,सदानंद पाटील,प्रा.पंडीत घुले यांच्या सह वामनदादा कर्डक यांच्या असंख्य रसिक चाहत्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment