दिव्यरत्ना पाटील-सर्पे यांना "आदर्श वकील", पुरस्कार जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 16 August 2023

दिव्यरत्ना पाटील-सर्पे यांना "आदर्श वकील", पुरस्कार जाहीर

किनवट,ता.१६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तळेगाव(ता.मावळ जिल्हा पुणे) तर्फे देशातील वकिलांना देण्यात येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातून ॲड.दिव्यरत्ना पाटील- सर्पे  यांना २०२३ वर्षीचा 'बेस्ट ॲडव्होकेट', हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  

     दिवाणी व फौजदारी न्यायालय, किनवट येथे त्या  १३ वर्षा पासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत.या काळात त्यांनी अनेक दिवाणी व फौजदारी खटले जिंकत महिला विधीज्ञ म्हणून स्वतःला सिद्ध केले. त्यांच्या या  कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी, दुर्गम तालुक्यातील महिला विधीज्ञ यांची निवड करण्यात आली आहे. ही बाब निश्चितच सन्मानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला,तळेगाव दाभाडे, पुणे येथे ता.१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

   या निवडीबद्दल किनवट तालुका अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.आर.डी.सोनकांबळे, जेष्ठ विधीज्ञ अनंतराव वैद्य, ॲड.मिलिंद सर्पे, ॲड.चव्हाण यू.बी.ॲड.चव्हाण ए.जी, ॲड.दिलिप काळे,प्रा.रविकांत सर्पे, विजय कावळे,भोकर, पुंडलिक मुनेश्वर,कैलास भगत,मा.सभापती ,न.पा.,किनवट),दशरथ पवार,रमेश मुनेश्वर, ,प्रा.सुबोध थोरात, ॲड.अभिजित वैद्य,ॲड. सचिन गिमेकर प्रा.सुबोध सर्पे, व 'मिडल पाथ', या  न्युज पोर्टल चे संपादक सम्यक सर्पे आदिनी  दिव्यरत्ना पाटील-सर्पे  यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages