औरंगाबाद :
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वादाचा गैरफायदा घेत संघाच्या हस्तकांना, भ्रष्ट व चारित्र्यहीन लोकांना घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी सदस्य एस पी गायकवाड यांनी स्वतःहून राजीनामा देऊन संस्थेत लुडबुड करू नये अन्यथा त्यांना नागसेनवनात पाय ठेऊ देणार नसल्याची भूमिका पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थी व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वादाचा गैरफायदा घेत संस्थेचे माजी विश्वस्त एस पी गायकवाड यांनी संस्थेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दावणीला बांधण्याच्या उद्देशाने संघाचे हस्तक असलेले भ्रष्ट व चारित्र्यहीन सदस्य संस्थेत घुसविण्याचा प्रयत्न चालवला आहे समाजात या बाबत संताप व्यक्त होत असल्याने मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे आज दुपारी 2 वाजता ह्या विरोधातील लढ्याची भूमिका ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार, माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,भाजप चे माजी आमदार श्रीकांत जोशी, डॉ.बी शिलाराणी, माजी सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर,उद्योगपती सी आर सांगलीकर यांची निवड झाल्याचे वृत्त समजताच मोपलवार,भापकर,जोशी हे भाजप-आरएसएस शी संबंधित चारित्र्यहीन, भ्रष्ट लोक संस्थेत घुसविण्याचा प्रयत्न एस पी गायकवाड यांच्या कडून होत असल्याने याचा तीव्र निषेध बैठकीत करण्यात आला.
एस पी गायकवाड हे वयोवृद्ध असून त्यांना आधाराशिवाय चालताही येत नसल्याने ते संस्थेचा कारभार सांभाळण्यास सक्षम नसल्याने संस्थेचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी या बैठकीत अनेकांनी बोलताना केली.
आंबेडकरी चळवळीची मातृसंस्था म्हणून संस्थेच्या हिताविरुद्ध एस पी गायकवाड सारख्या दलालांकडून होत असलेल्या घुसखोरी विरोधात लढ्याची उभारण्यासाठी भव्य मोर्चा काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पीपल्स च्या शाळा महाविद्यालयात सर्वांनी प्रवेश घ्यावा, संस्थेच्या प्राचार्य-कर्मचारी मनमानी करत असल्याने विद्यार्थी संख्या रोडावली आहे, विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यास प्रचार्याना जाब विचारण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वादात सत्ताधारी विरोधक व धर्मदाय आयुक्त हे जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे परिणामी संस्थेची वाताहत होत असून या विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांकडे संस्थेची सूत्र सन्मानपूर्वक सोपविण्यात यावी असे मनोगत सर्वांनी व्यक्त केले.
यावेळी आजी-माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक व आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment