किनवट शहरातील वारंवार खंडित होत असलेला विजपुरठा सुरळीत करावा ; अवास्तविक वाढीव विज बिलाची शिवसेना (उबाठा) च्या वतीने होळी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 26 August 2023

किनवट शहरातील वारंवार खंडित होत असलेला विजपुरठा सुरळीत करावा ; अवास्तविक वाढीव विज बिलाची शिवसेना (उबाठा) च्या वतीने होळी



किनवट प्रतिनिधी : 

 शहरासह ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा जुन्या डीपी विद्युत खांब तसेच विद्युत तारा बदलून नवीन बसविण्याची कारवाई करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने विद्युत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना देण्यात आला आहे.

 मागील अनेक दिवसापासून किनवट शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे भर पावसाळ्याच्या दिवसात रात्री बे रात्री तासंनतास वीज गुल होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. साधारण पाऊस व वाऱ्यात एकदा वीज खंडित झाली तर  चार चार तास वीज पुरवठा सुरळीत होत नाही.
महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यालयाकडून दुरुस्तीच्या नावाखाली तासंतास वीज खंडित केल्या जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. विजेअभावी शासकीय व खाजगी कामे खोळंबत असून जुन्या डी पी, विद्युत तारा बदलल्या नसल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होऊन वीज गुल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे दुरुस्तीच्या नावाखाली वीज कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत.विशेषता  ग्राहकांच्या वीज मीटरची प्रतिमाह प्रत्येक्ष रीडिंग न करता अवास्तव बिले ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू आहे. वीज वापरापेक्षा जास्तीचे बिल येत असल्याने वीज ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या पावसाळा असला तरी उकाडा वाढला आहे. अशा अवस्थेत तासंतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे बेहाल होत आहेत. विद्युत कार्यालयाने किनवट शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करून जुन्या डीपी, विजेचे खांब,विद्युत तारा बदलाव्या तसेच प्रतिमाह रीडिंग घेऊन त्याप्रमाणेच विजाकारणी करून बिले देण्यात यावीत अशी मागणी शिवसेनेने केली. या मागण्याचा सहानभूतीपूर्वक विचार न झाल्यास वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे शहर प्रमुख बाबुभाई जाटवे संतोष तक्कलवार संजय धोबे महेश ठाकूर, कुमार कोरडे मुर्तुजा भाई बालाजी गुरलेवाड, ताहेर भाई संभाजी ब्रिगेडचे आकाश इंगोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


दरम्यान विद्युत वितरण कार्यालयाला निवेदन सादर करतेवेळी शेकडो शिवसैनिकांनी विद्युत कार्यालयाच्या प्रांगणात अवास्तव वीज बिलांची होळी केली असून विजेचे प्रश्न तात्काळ मार्गी लागले नाही तर विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे व तालुकाप्रमुख मारुती दिवसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी, शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन  विद्युत कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत कोरडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages