मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व नांदेड जिल्ह्याला मान्य असल्यामुळेच मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश-आ. कल्याणकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 9 September 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व नांदेड जिल्ह्याला मान्य असल्यामुळेच मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश-आ. कल्याणकर

 


जयवर्धन भोसीकर, प्रतिनिधी 

नांदेड :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं नेतृत्व नांदेड जिल्ह्याला मान्य असल्यामुळे बहुजन नेतृत्व मंगेश कदम यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला असून  त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल असा विश्वास आ. बालाजी कल्याणकर यांनी मंगेश कदम मित्र मंडळाने आयोजित केलेल्या भव्य रॅलीत व्यक्त केला. यावेळी मित्रमंडळाच्या वतीने भगवे व निळे झेंडे हातात घेऊन ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची  अतिशबाजी करून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

 

काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य बहुजन नेतृत्व मंगेश कदम व मनापाच्या माजी नगरसेविका सौ. ज्योती मनीष कदम, ऍड धम्मपाल कदम यांनी  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उत्तर विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ. बालाजीराव कल्याणकर, खा. हेमंत पाटील व शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली नुकताच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात  प्रवेश केला असून पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच मंगेश कदम यांच्या नांदेड आगमनानिमित्त मंगेश कदम समर्थकांनी त्यांच्या स्वागतार्थ भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन शनिवारी  केले  होते.


या रॅलीत मोठ्या प्रमाणात समर्थकांनी हातात भगवे व निळे झेंडे घेऊन मोटार सायकल रॅली काढली त्यामुळे शिव शक्ती भिम शक्ती एकत्र आल्याचे समीकरण दिसलें 

सदर रॅलीत मंगेश कदम, आ. बालाजी कल्याणकर हे उपस्थित होते त्यांची भव्य मिरवणूक मोटारसायकल रॅलीद्वारे काढण्यात आली. प्रथम आगमन होताच

मंगेश कदम व आ.बालाजीराव कल्याणकर यांनी 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपल्या शिवसेनेतील राजकीय वाटचालीस  सुरुवात केली.


पुढे ही रॅली वर्कशॉप, राजकॉर्नर, चैतन्यनगर ते महसूल कॉलनी तरोडा मार्गे त्यांच्या कदम यांच्या निवासस्थांनापर्यन्त गेली. यावेळी मंगेश कदम मित्रमंडळाचे धम्मपाल कदम,नागेश कांबळे,अशोकराव देशमुख,राहुल जमदाडे,

विजय हनवते, अरविंद सरपाते, मनीष कदम, बाळू कागडे,प्रमोद आळणे, भारत कंधारे, प्रवीण घुले, मयूर कोकरे,शशिकांत पाटील गाढे, अरविंद पवनकर,भीमा व्यवहारे, विजय बगाटे, विकी गायकवाड, गौतम सोनकांबळे, संजय कांबळे, प्रवीण वाघमारे,संतोष पवार,चंदू गजभारे, सय्यद अर्शद, बंटी खिल्लारे, सचिन पोहरे, सचिन धुतुरे, बलमा मस्के,विनय पंडित, सचिन सूर्यवंशी, आकाश कदम अमोल पंडित, अमित लिंबेकर यांच्यासह बिलोली, कुंडलवाडी, कंधार व जिल्ह्याभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.मंगेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे दिसून येते.

No comments:

Post a Comment

Pages