वामनदादा कर्डक जयंती निमित्त झालेल्या गीत गायन स्पर्धेत प्रतिभा पाटील प्रथम, शेख कबीर द्वितीय तर दत्ता जायभाये तृतीय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 September 2023

वामनदादा कर्डक जयंती निमित्त झालेल्या गीत गायन स्पर्धेत प्रतिभा पाटील प्रथम, शेख कबीर द्वितीय तर दत्ता जायभाये तृतीय

किनवट ( प्रतिनिधी ) :

महाकवी वामनदादा कर्डक जयंती आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झालेल्या गीत गायन स्पर्धेत प्रतिभा पाटील प्रथम, शेख कबीर द्वितीय तर दत्ता जायभाये तृतीय क्रमांकाने विजयी झाले आहेत.      

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुश भालेराव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. गंगारेडी बैनमवार, नगरसेविका जिजाबाई मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या गंगुबाई परेकार होत्या. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वागत अध्यक्ष दिलीप मुनेश्वर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आयोजक किशन परेकार यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. त्यानंतर गीतगायन स्पर्धेला सुरुवात झाली. 

     अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आदिलाबाद येथील संगीतकार चित्रपट दिग्दर्शक फहिम सरकार, महाकवी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील आणि संगीततज्ञ सय्यद अली होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले तर आभार एस.इमरान अली यांनी मानले. एकापेक्षा एक गीत गायनामुळे श्रोते शेवटपर्यंत टाळ्यांचा गजर करत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामराज माडपेल्लीवार, अनिल भंडारे, विजय वाठोरे, भीमराव पाटील, एस. अहमद अली, विवेक ओंकार, गंगाधर कदम आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages