युवकांनी ज्ञानाची कास धरावी - न्यायाधीश एस. बी. अंभोरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 7 September 2023

युवकांनी ज्ञानाची कास धरावी - न्यायाधीश एस. बी. अंभोरे


किनवट :

 युवकांनी ज्ञानाची कास धरावी  कायद्या बद्दल सजग राहून  चारित्र्य संपन्न नागरिक बनावे असे नागरिक घडून देशाच्या विकासात आपला हातभार लावावा किनवटचे न्यायाधीश एस बी अंभोरे यांनी केले येथील सरस्वती विद्यामंदिर महाविद्यालयात दि 7 सप्टेंबर रोजी कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करत असताना ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भंडारे  वकील संघांचे अध्यक्ष  ॲड. राहुल सोनकांबळे,ॲड. अरविंद चव्हाण, ॲड.दीपा सोनकांबळे, ॲड.  विलास सूर्यवंशी, ॲड. सुनील येरेकार, ॲड.विजय कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

        प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या स्वागत गीताने  या कार्यक्रमाची सुरुवात झाली.  ॲड.   दिलीप काळे यांनी प्रास्ताविक करताना कायद्या विषयी जनजागृती व्हावी  अज्ञानामुळे  गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये यासाठी हे शिबिर आयोजित केले असल्याचे सांगितले न्यायाधीश श्री अंभोरे म्हणाले  स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे  ही आपली संस्कृती आहे. परिवाराची मुख्य जबाबदारी स्त्रियाच सांभाळतात त्या चांगल्या गुणांचे संस्कार आपल्या मुलांवर घडवतात.  आपण सर्व युवकांनी विद्यार्थ्यांनी  नैतिकता जपली पाहिजे.असे आवाहन करत म्हातारे  आई-वडिलांना आपल्या मुलांकडे  पैसे मागण्याची वेळ येते हे चांगल्या गुणांचे लक्ष नाही. ती आपली संस्कृती ही नाही. त्यामुळे आई-वडिलांचा सांभाळ करावा आणि चारित्र्य संपन्न गुण समाजात रुजवावे जेणे करून सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाहीत असे शेवटी त्यांनी आवाहन केले.     ॲड.राहुल सोनकांबळे युवकांच्या विषयी मत व्यक्त करताना सांगितले की वाहन कायदा माहित नसताना, आपल्याकडे लायसन्स नसताना रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवणारे नकळत गुन्हेगारच आहेत आपण असे प्रकार करू नये असे आवाहन केले. ॲड.चव्हाण यांनी विद्यार्थी दशेपासून कायदेविषयक जनजागृती अभियान  फायदे सांगितले ॲड. सूर्यवंशी यांनी समाजात कायद्याचे ज्ञान सर्व दूर व्हावे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार नाही असे सांगितले. ॲड. दीपा सोनकांबळे यांनी स्त्री ही समाजाची महत्त्वाची घटक असून स्त्री शिक्षण स्त्री सबलिकारण स्त्रीयांविषयी कायदे यावर मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ भंडारे यांनी विद्यार्थी जीवनात कायद्याची जनजागृती महत्वाची असल्या चे सांगितले. प्रा डॉ किरण आयणेनवार यांनी सूत्रसंचालन व प्रा डॉ सुनील व्यवहारे यांनी आभार मानले प्रो डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता समन्वयक प्रा द्वारकाप्रसाद वायाळ, न्याय मूल्यांकन समन्वयक प्रा तपनकुमार मिश्रा, प्रा डॉ अजय किटे प्रा डॉ विजय उपलंचवार न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक लिंगन्ना मिसलवार, कर्मचारी काणेकर,पोलीस जमादार नवाब खान पठाण    यांच्या सह  महाविद्यालयाचे  प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रागीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Pages