नांदेड, प्रतिनिधी, दि.७ :- लोकशाही न्युज चॅनलच्या संपादक कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हा तत्काळ मागे घेण्याची मागणी करून राज्य शासन माध्यमांची मुस्कटदाबी करीत असल्याच्या निषेधार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज गुरुवार दि.७ सप्टेंबर रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. लोकशाहीचा आधास्तंभ असलेल्या लोकशाही न्युज चॅनलने केवळ माध्यम या भूमिकेतून भाजपाचे ज्येष्ठ नेते किरिट सोमय्या यांच्याशी निगडित एक बातमी आपल्या चॅनेलवर प्रदर्शीत केली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी ती बातमी आपली नसल्याचा खुलासा केला नव्हता किंवा त्या व्हिडीओत आपण नाही असा दावाही केला नव्हता. तसेच हे वृत्त प्रसिद्ध होऊन जवळजवळ दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या घटनेनंतर सोमय्या यांनी आपली चूक मान्य न करता लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करून माध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून भारतीय लोकशाहीसाठी घातक आणि प्रसार माध्यमांच्या अधिकारांवर गदा आनणारी आहे. त्यामुळे संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा , अन्यथा अन्य माध्यमे आणि पत्रकार संघटनांना यावर कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,विभागीय संघटक प्रकाश कांबळे, परिषद प्रतिनिधी सुभाष लोणे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे,जिल्हा सरचिटणीस राम तरटे, उपाध्यक्ष पंडित वाघमारे, रविंद्र संगनवार, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी ,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, जिल्हा सरचिटणीस संघरत्न पवार, उपाध्यक्ष प्रल्हाद लोहेकर, सुरेश काशिदे, कमलाकर बिरादार, पंढरीनाथ बोकारे, मनोहर कदम, राजेश शिंदे, किरण कुलकर्णी, श्याम कांबळे, यशपाल भोसले, प्रशांत गवळे, सुधीर प्रधान, प्रल्हाद कांबळे,गजानन कानडे, राजकुमार कोटलवार, गौतम गळेगावकर, नुकुल जैन, नारायण गायकवाड, दीपक कसबे, शेख मौला, मिर्झा आजम बेग, इंजि. इम्रान खान, कुंवरचंद मंडले, कृष्णुरकर ,अमरदीप गोधने, अर्जून राठोड, हैदर अली, प्रमोद गजभारे,राहुल साळवे, मो. रफी, किरण कांबळे, संजय सूर्यवंशी, मो. सुलेमान खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment