कापसी येथील नागरिक स्मशानभूमीत आमरण उपोषणाला बसणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 7 September 2023

कापसी येथील नागरिक स्मशानभूमीत आमरण उपोषणाला बसणार



नांदेड प्रतिनिधी,सचिन वाघमारे :

नांदेड - हैद्राबाद राज्यमार्गावरील लोहा तालुका कापसी (खु) येथील दलीत समुहापैकी मातंग स्मशानभुमी जागेवर तत्कालीन कापसी खुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच  शांताबाई मारोती कापसे यांच्या कुंटूबातील नागोराव रामराव कापसे हे सरपंच पदाचा कारभार सांभाळतात, गावातील सवर्ण जातीतील मधुकर प्रकाश ढेपे,आनंदा शिवाजी मोगले व गोविंद शंकर मेथे यांनी सरपंच प्रतिनिधी नागोराव कापसे व पार्टीप्रमुख पंडित एकनाथ मेथे यांच्याशी संगणमत करून मधुकर प्रकाश ढेपे,प्रकाश विठ्ठल ढेपे,लक्ष्मीबाई प्रकाश ढेपे,सविता मधुकर ढेपे,शंकुतला आनंदा मोगले,कल्पना गोविंदराव मेथे,गोविंदराव शंकरराव मेथे,विलास गोविंदराव मेथे,आदी लोकांनी ३० ते ३५ गुंठे जमीन बेकायदेशीररीत्या ग्रामसेविका यांच्याकडून नमुना नंबर ८ च्या रजिस्टरला खतवून त्या ठीकाणी ताराचे कुंपण करण्यात आले असुन, बेकायदेशीर नोंदी लावुन केलेले अतिक्रमण काढण्यात यावे व त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने कापसी खुर्द येथील दलीत स्मशानभूमी जागेवरच  दि.8 सप्टेंबर रोजी  लोकस्वराज्य आंदोलन तालुका संघटक एकनाथ रेडे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

    दि.1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी नांदेड व तहसीलदार लोहा यांना दिलेल्या निवेदनात म्हण्टले आहे की, लोहा तालुक्यातील कापसी (खु) , येथील दलीत स्मशानभूमी जागेवर  सरपंच,पार्टी प्रमुख, ग्रामसेविका व गावातील समाजकंटक यांच्याशी संगणमत करून बेकायदेशीर नोंद लावण्यात आली आहे.या अतिक्रमणामुळे स्मशानभुमीसाठी अडचण निर्माण होत असुन,या बेकायदेशीर नोंदीची चौकशी करावी , दोषींवर अनुसूचित जाती,जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे,तात्काळ कार्यवाही नाही झाल्यास स्मशानभुमी जागेवरच लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा लोकस्वराज्य आंदोलन जेष्ट नेते एकनाथ रेडे यांनी दिला आहे.

  या निवेदनावर एकनाथ रेडे ,देवबा रेडे ,तानाजी वाघमारे,नामदेव रेडे,चंपती रेडे,बळीराम सुर्यतळ,संभाजी सुर्यतळ,माधव टोकलवाड,राघो रेडे,नागोराव वाघमारे,नामदेव रेडे,गणेश रेडे,चंपती रेडे,गोविंद रेडे,साहेबराव कांबळे,रावसाहेब क

कांबळे,सुदर्शन वाघमारे आदीच्या स्वाक्षरी असलेले निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड,पोलीस अधिक्षक नांदेड,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड,तहसिलदार लोहा,गटविकास अधिकारी लोहा,उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार,पोलीस स्टेशन उस्माननगर,यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages