अॅड‌.ताजने यांच्या घरी झालेल्या जबरी चोरी प्रकरणी तपासाला गती द्या; वकिल संघाची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 October 2023

अॅड‌.ताजने यांच्या घरी झालेल्या जबरी चोरी प्रकरणी तपासाला गती द्या; वकिल संघाची मागणी

किनवट,दि.१९ :किनवट न्यायालयातील जेष्ठ वकील अॅड. सुभाष ताजने यांच्या गोकुंदा (ता.किनवट)येथिल घरी आठदिवसांपुर्वि अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी करून तीन लाखांच्या वर ऐवज लंपास केला होता.

      याप्रकरणी पोलिसांनी जातिने लक्ष घालून तपासास गती द्यावी व अज्ञात चोरट्यांना लवकरात लवकर    जेरबंद करावे,या मागणीसाठी आज (ता.१९)किनवट न्यायालयातील सर्व वकिलांनी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राहुल सोनकांबळे व सचिव अॅड.सुनिल सिरपुरे यांच्या नेतृत्वाखाली  पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांची पोलिस ठाण्यात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली.

      सध्या माहूर येथील नवरात्र बंदोबस्तात आम्हच्या ठाण्याचा मोठा  कर्मचारी वर्ग आहे.यामुळे सध्या तपास थंड आहे.याप्रकरणी लवकर निश्चितच तपासात गती देण्यात येईल, असे आश्वासन  पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी  सर्व वकिलांसमक्ष दिले. यावेळी वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages