नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) व फिरता दवाखान्याचा लोकार्पण सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 October 2023

नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) व फिरता दवाखान्याचा लोकार्पण सोहळा

किनवट :

 भारत जोडो युवा अकादमी द्वारा संचलित, साने गुरुजी रुग्णालय व संशोधन केंद्र मागील 30 वर्षापासून या परिसरातील जनतेला नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक आरोग्य सुविधा देत आहे.

 याचाच एक भाग म्हणून संस्था दी रोटरी इंटरनॅशनल यांच्या आर्थिक सहकार्यातून लहान मुलांच्या उपचारासाठी सर्व अत्याधुनिक  सुविधांनी युक्त असे नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) सुरू करीत आहे.

 या नवीन NICU विभागाचा लोकार्पण सोहळा दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे सकाळी 11:00 वाजता दि रोटरी इंटरनॅशनल चे प्रांतपाल श्रीमती स्वातीताई हेरकळ यांच्या हस्ते होणार आहे.

 तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास यांच्या सौजन्याने मिळालेल्या MUMMY ( Multy Utility Mobile Medical Yaan) अर्थात फिरता दवाखाना खास या परिसरातील गरोदर मातांच्या तपासणीसाठी सर्व सुविधांनी युक्त असे वाहन याचेही उदघाटन यावेळी होणार आहे.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस. कार्तिकेयन,( भा.प्र. से. ) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट, दि रोटरी इंटरनॅशनलचे डॉ. ओम मोतीपवळे, श्री सुधीर लातूरे, श्री उमेश गरुडकर, श्री किशोर पावडे, श्री मुरलीधर भुंतडा, श्री प्रशांत देशमुख, डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल, हे उपस्थित राहणार आहे.


 तरी यालोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Pages