वेरूळ : येथे थायलंड येथील डू द फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. दनाय चंचावचाय यांच्या वतीने ५०० बौद्ध उपासकांना वेरूळ येथील जयभीम बुद्ध विहारात अन्नधान्य व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी हा दान सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी भंते लकी यांचे मार्गदर्शन आणि वाट महाथाट ट्रस्ट , औरंगाबाद व इंडिया सेंटर यांचे सहकार्य लाभले. अजिंठा डान्स ग्रुप, वेरूळ डान्स ग्रुपच्या मुलांनी पाहुण्यांचे स्वागत नृत्यगीतांनी केले. डॉ. दनाय चंचावचाय यांच्यासह थायलंड येथून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भंते लकी यांनी उपासकांना त्रिसरण आणि पंचशील दिले. डॉ. दनाय चंचावचाय यांनी हे दानपुण्य भगवान बुद्धांच्या प्रेरणेतून दिले जात असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी प्राचार्य डॉ. मनोहर वानखेडे, डॉ. मिलिंद आठवले व डॉ. विनोद अंभोरे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण जाधव आणि सूत्रसंचालन प्रा.अरविंद भराडे यांनी केले. कार्यक्रमासाठी राहुल जाधव, सुजित म्हस्के व भाऊ कारभारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment