‘आपलं किनवट-एक शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 28 October 2023

‘आपलं किनवट-एक शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन


किनवट,दि.(प्रतिनिधी) : येथील ब.पा.महाविद्यालयातील प्रा.संतोष पवार लिखिथ ‘आपलं किनवट-एक शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किनवटच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.     

      यावेळी खा.हेमंत पाटील म्हणाले की, प्रा. संतोष पवार यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून किनवट परिसराचा अभ्यास केला. गेली तीन वर्ष सतत अनेक ऐतिहासिक स्थळांना,  तसेच विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भेटी देऊन त्यांनी हे ऐतिहासिक संशोधनात्मक अवघड कार्य पूर्ण केलेले आहे. या पुस्तकांमधून भावी पिढीला  किनवट येथे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व  सांस्कृतिक विकास व दळणवळण साधने  कशी विकसित झाली याचेसह इतरही अनेक बाबीबद्दल परिपूर्ण अशी माहिती मिळणार आहे. तसेच या पुस्तकातून नवीन पिढीला संशोधनासाठी प्रेरणा मिळणार आहे. या पुस्तकाची प्रस्तावनासुद्धा खा.हेमंत पाटील यांनी लिहिलेली  आहे.  या प्रसंगी येथील गोंडवाना प्रकाशनाचे प्रकाशक बालाजी तोटेवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष बालाजी मुरकुटे, शिवसेना शहर प्रमुख सूरज सातुरवार, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील तसेच अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages