संविधानिक मूल्य उध्वस्त करण्याच्या षडयंत्रामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 November 2023

संविधानिक मूल्य उध्वस्त करण्याच्या षडयंत्रामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात

संभाजीनगर:

भारतीय राज्य घटनेने बहाल केलेले समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय हे संविधानिक तत्व उध्वस्त करण्याचे षडयंत्र देशात सुरू असल्याने हे षडयंत्र हणून पाडण्यासाठी लढा न उभारल्यास नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात येणार असल्याने या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन ७४ व्या संविधान गौरव दिनानिमित्त रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून भडकल गेट येथील संविधान प्रस्ताविकेवर पुष्पवृष्टी करत प्रतिकृतीसमोर प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच सुमारे ५०० नागरिकांना मिठाई वाटप करण्यात येऊन प्रस्ताविकेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.

  


यावेळी डॉ.प्रमोद दुथडे, डॉ.देवानंद वानखेडे, निवृत्त शिक्षक के.एम बनकर, कवी देवानंद पवार, इंजि.भीमसेन कांबळे, सुधीर शेषवारे, प्रा.सिद्धोधन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तर सचिन निकम, अविनाश कांबळे, गुणरत्न सोनवणे, शैलेंद्र म्हस्के, अतुल कांबळे, डॉ.अविनाश सोनवणे,सचिन शिंगाडे,सिद्धार्थ मोरे, सिद्धार्थ सदाशिवे, प्रा.प्रबोधन बनसोडे,कुणाल भालेराव, सचिन आंबेवाडीकर, उज्वल बनकर,प्रकाश निकम, रुपराव खंदारे, प्रमोद निकाळजे, मिलिंद जमधडे, मिलिंद पट्टेकर, सिद्धार्थ दिवेकर, सनी देहाडे, प्रवीण गायकवाड, रत्नदीप रगडे, सुमेध नरवडे, मनिषाताई साळुंखे, करुणाताई पवार, राजपाल बनकर, आदींसह महिला व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages