महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन ,मोटार सायकल वापरणे केले बंद सिमकार्ड देखिल केले परत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 24 November 2023

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन ,मोटार सायकल वापरणे केले बंद सिमकार्ड देखिल केले परत

किनवट  प्रतिनिधी:-

लाइनमनची वर्ग चारमधून तीनमध्ये पदोन्नती करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीतील वर्ग चारमधील किनवट तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. लाइनमनचे वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये समायोजन करावे, तसेच प्रत्येक लाइनमनला ग्राहक सेवेसाठी सध्या ५ लिटर पेट्रोल मिळते, ते वाढवून द्यावे तसेच सध्या किनवट मध्ये एकच सबस्टेशन असलल्याने सर्व लोड एकाच सबस्टेशनवर येत आहे त्याचा देखील परिणाम महावितरण कर्मचारी अपुर्‍या स्टाफवर  पडत आहे .

लाईनमनला स्वतंत्र वेतनश्रेणी द्यावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलनसुरू आहे. ३० ऑक्टोबरपासून आंदोलन करण्यात येत आहे. ३० रोजी सर्व लाइनमननी कंपनीने दिलेले सीमकार्ड परत दिले. ६ नोव्हेंबरपासून वसुली काम बंद करण्यात आले आहे गुरुवारी सर्व लाइनमननी मोटारसायकल वापरणे बंद केले आहे. २८ नोव्हेंबरपासून असहकार व काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. २ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ११ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages