अभिवादन करण्यास मज्जाव करणाऱ्या उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे ना निलंबित करा ; आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 7 December 2023

अभिवादन करण्यास मज्जाव करणाऱ्या उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे ना निलंबित करा ; आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी

संभाजीनगर :

 काल दि.०६ डिसें रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परीक्षा विभागातील सर्व कर्मचारी हे इमारतीत अभिवादानासाठी जमलेले होते व परीक्षा विभागाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याची सर्व तयारी कर्मचाऱ्यांनी केलेले होती परंतु उपकुलसचिव डॉ.विष्णू कऱ्हाळे यांनी परीक्षा भवन येथील कर्मचाऱ्यांनी कुणाच्या परवानगीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता ? मनमानी करता का ?  म्हणून कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत अनेक आक्षेपार्ह विधान केल्याने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असलेल्या विद्यापीठातच त्यांना अभिवादन करण्यास मज्जाव होत असल्याने आंबेडकरी समुदायामध्ये रोष निर्माण झाला असल्याने डॉ.विष्णू कऱ्हाळे यांनी महामानवाचा अवमानकारक उल्लेख करून अभिवादनास मज्जाव केल्याने त्यांना तात्काळ निलंबित करावे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


यावेळी परीक्षा विभागाच्या संचालक डॉ.भावना गवळी यांनी कऱ्हाळे यांना समजपत्र दिले असून तात्काळ खुलासा करण्याचे सांगितले आहे त्यानंतर तात्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages