ओजस'मध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 7 December 2023

ओजस'मध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर



नांदेड: जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा औराळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हडको, नांदेड येथील ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने ८ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत ज्ञानोबा सोनसळे-औराळकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हडको, नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात अनुभवी व विशेष तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात मधुमेह तज्ञ व भुल तज्ज्ञ डॉ. भास्कर औराळकर, पोटविकार तज्ञ डॉ. प्रणित साळवे, डॉ. प्रदीप मुगटकर, स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ डॉ. किरण आंबटवार, डॉ. माधुरी टोम्पे, डॉ. कल्पना औराळकर तसेच डॉ. गंगा जोगदंड इंगळे हे गरजू रूग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधी वाटप करणार आहेत. नवीन नांदेड भागातील सिडको-हडको वसाहतीसह  बळीरामपूर, वसरणी, धनेगाव, तुप्पा, गोपाळचावडी, वाजेगाव, काकांडी, गुंडेगाव, बाभूळगाव, असदवन तसेच शाहूनगर, वाघाळा आदी परिसरातील गरजू रुग्णांनी सदरील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.भास्कर डी. औराळकर, डॉ. कल्पना औराळकर, श्रीमती शांताबाई औराळकर तसेच व्यवस्थापिका प्रियांका पंडित यांच्यासह त्यांचे अन्य सर्व सहकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages