महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदात्यांचा रक्तदानास उस्फुर्त प्रतिसाद ;135 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 6 December 2023

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदात्यांचा रक्तदानास उस्फुर्त प्रतिसाद ;135 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग


संभाजीनगर :

रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भडकल गेट येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले त्यात 135 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.

तर एच डी एफ सी बँकेच्या वतीने रक्तदात्यांना प्रोत्साहन पर भेटवस्तू देण्यात आल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढी च्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले.


रक्तदान उपक्रमाचे हे सातवे वर्ष होते.



पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस उपायुक्त नवनीत कुमार, स.पो. आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे,डॉ.प्रमोद दुथडे, दिनकर ओंकार,श्रावण गायकवाड, दौलतराव मोरे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.



शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन निकम, प्रा.प्रबोधन बनसोडे, सिद्धार्थ दिवेकर, गुणरत्न सोनवणे, शैलेंद्र म्हस्के, रेखाताई पवार,सनी देहाडे,अविनाश कांबळे,अतुल कांबळे, तुषार अवचार, सम्यक सर्पे, सचिन गायकवाड, संदिप अहिरे, सिद्धार्थ मोरे, सुमित नावकर, अमित दांडगे, राष्ट्रपाल गवई,आदि बनसोडे,  विजय जाधव, पवन पवार,विकास रोडे, विकास हिवराळे, सचिन शिंगाडे,रामराव नरवडे, नितीन निकम यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages