महापरिनिर्वाणदिना निमत्य रक्तदान शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 5 December 2023

महापरिनिर्वाणदिना निमत्य रक्तदान शिबिराचे आयोजन

नांदेड | प्रतिनिधी येथील धम्माश्रय युवा मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची, त्यांच्या त्यागाची जाणीव युवा पिढीला व्हावी आणि युवकांनी एकत्र यावे म्हणून प्रभात नगर येथील धम्माश्रय युवा मंचच्या वतीने बुधवार ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीनगर येथील भाजी मार्केट परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मंजुषा जाधव अमित राठोड, नारायण मिसाळ, पी. के. नारवटकर गटविकास अधिकारी पंचायत समिती, अरुण धुतमल, सोनू दरेगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, प्रकाश गच्चे यांची उपस्थिती राहणार आहे. या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन धम्माश्रय युवा मंचचे अध्यक्ष संदीप वाठोरे आणि त्यांच्या + मित्रमंडळींनी केले आहे. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभात येथील भैय्यासाहेब आंबेडकर बुद्ध विहारापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सायंकाळी ७ वाजता पणती ज्योत रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे धम्माश्रय युवा मंच च्या  वतीने कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages