बरड शेवाळा येथे दिव्यांग (अपंग) दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 4 December 2023

बरड शेवाळा येथे दिव्यांग (अपंग) दिन साजरा

हदगाव :

बरडशेवाळा ता.हदगाव जिल्हा नांदेड येथील एस.एम. निवासी संमिश्र अपंग तांत्रिक प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र येथे 'हेलेन केलर व लुईस ब्रेल' यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिव्यांग (अपंग) दिन साजरा करण्यात आला दरवर्षी जगभरात दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो.

दिव्यांगाना समाजात मानाचे स्थान मिळावे तसेच आपण जे करू शकतो ते सर्व काही तेही करू शकतात म्हणूनच त्यांना सहानुभूतीची गरज आहे. कोणताच दिव्यांग बांधव भगिनी कमकुवत नसतो त्यांच्याकडे अफाट अशी ऊर्जा असते फक्त आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना बळ देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे असे मत कार्यशाळेतील लिपिक श्री अक्षय कांबळे यांनी केले.

जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी कार्यशाळेतील कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages