जीवनदिप महाविद्यालयात मृदा महोत्सव साजरा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 21 December 2023

जीवनदिप महाविद्यालयात मृदा महोत्सव साजरा.


गोवेली : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दर वर्षी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात याच्या एक भाग म्हणून आज दि.२१ रोजी  कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय भूगोल विभाग,ग्रीन क्लब  व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन  साजरा करण्यात आला. यावेळी महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी कुमार जाधव,संते साहेब,कृषी सहाय्यक बनसोडे साहेब, पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी,संचालक प्रशांत घोडविंदे यांनी सेंद्रिय खताचे प्रकार व त्याचे कृषी तील महत्व, मृदा संवर्धन मृदेची धूप व प्रदूषण याविषयी सर्वोत्तम माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा. राजू धसाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी विशाखा तरे हिने केले.यावेळी प्रदर्शनाच्या माध्यमातून परिसरातील विविध प्रकारच्या मृदेचे नमुने व पोस्टर  ठेवण्यात आले होते. प्रदर्शनात देवेश जाधव यांनी मृदेचे परीक्षण कसे करायचे व मृदेचा सामू ( ph) कसा ओळखायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाला  प्राचार्य डॉ. के. बी. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे,भूगोल विभाग प्रमुख डॉ.विजय हेरोडे,प्रा.उद्धव खोमने तसेच प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages