विद्यापीठाचे माजी कुलसचिव तथा जेष्ठ विधीज्ञ प्रा. एस डी तथा संपतराव देवजी पगारे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 6 January 2024

विद्यापीठाचे माजी कुलसचिव तथा जेष्ठ विधीज्ञ प्रा. एस डी तथा संपतराव देवजी पगारे यांचे निधन


संभाजीनगर :

 लक्ष्मी कॉलनी येथील राहिवासी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव तथा जेष्ठ विधिज्ञ प्रा. एस. डी. पगारे यांचे  आज दि.६ रोजी सायंकाळी 8:35 वाजता   निधन झाले असून मृत्य समयी ते 85 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ते निवृत्त मुख्य अभियंता हेमंत पगारे व ऍड. आनंद पगारे यांचे वडील होते.

मिलिंद कला महाविद्यालयात त्यांनी राज्यशास्त्र विषयांचे अध्यापन कार्य केले. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे विद्यापीठात उपकुलसचिव पदी सेवा बजावली तर कुलसचिव पदी १९९६ साली ते सेवानिवृत्त झाले.

उद्या रविवार दि.०७ रोजी दुपारी २:०० वाजता छावणी आठवडी बाजार येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


No comments:

Post a Comment

Pages