कल्याण :
जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि६ जानेवारी रोजी ग्रामदेवता आणि स्थानीय देवता सांस्कृतिक परंपरा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवरांच्या सन्मानार्थ स्वागत गीत सादर केले त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी दीपप्रज्वलन केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बीजभाषक अरुणा ढेरे प्रमुख वक्त्या डॉ. प्राची मोघे डॉ .विजय कुलकर्णी यांचे जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे सर यांनी शाल व तुळशीचे रोप आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच इतिहास संशोधक अविनाश हरड यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के बी कोरे यांनी स्वागत केले त्यानंतर अन्य उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.विजय कुलकर्णी यांनी केले त्यानी ग्रामदेवतेची सविस्तर माहिती सांगितली त्यात त्यांनी ग्रामदेवतांची नावे कशी पडली हे स्पष्ट केले त्यानंतर श्री.बांगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे यांनी मनोगतात त्यांच्या वक्तव्यातून इतिहास परिषद घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला जागृत देवता अजून भूतलावर आहे परंतु त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन अंधश्रद्धा पसरवून अनेक वेळेस लोकांना फसवले जाते असे होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या देवी देवतांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे.
त्यानंतर बीजभाषक अरुणा ढेरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात त्यांना आलेल्या देवी देवतां विषयी संशोधन नातील अनुभव सांगितले देवी देवतांशी संबंधित कथा सांगितली लोकसाहित्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे लोकपरंपरांचा जन्म आदीम काळापासून सुरू आहे तसेच सांस्कृतिक लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीशी निगडित मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले त्यानंतर २५ शोधनिबंध दोन सत्रात सादरकर्त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. शामराव वाघमारे हे होते तर द्वितीय सत्राचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी हे होते.या वेळी पुरातन वस्तूंचे व पुस्तकांचे कला दालन उभारण्यात आले होते याला सहभागी संशोधकानीं व मान्यवरांनी भेट दिली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ प्राची मोघे यांनी मार्गदर्शन केले व उपस्थित संशोधकानीं आपले परिषदे विषयी अनुभव मांडले. प्रा जया देशमुख यांनी शेवटी मान्यवरांचे आभार मानले या एक दिवसीय राष्ट्रीय इतिहास परिषदेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यात रिल्स मेकिंग या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणाली पष्टे व अंकिता हरड, द्वितीय क्रमांक मानसी धनगर व धनाजी चहाड ,तृतीय क्रमांक पूर्वा कराळे आणि इनाया पटेल ,पोस्टर मेकिंग या स्पर्धेत प्रथम पूर्वी शिरसागर ,द्वितीय क्रमांक कल्पेश शिंगवा, तृतीय क्रमांक मयुरी गायकर तसेच फोटोग्राफी या स्पर्धेत प्रथम क्रमांक यश गायकवाड द्वितीय क्रमांक सेजल पाटील, तृतीय क्रमांक विशाखा तरे यांनी पटकावला या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थिती होते कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी प्राचार्य डॉ.के.बी कोरे समन्वय प्रा.कविता काटकर सहसमन्वयक,प्रा. राजाराम कापडी,प्रा. दिवाकर मोरे शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य सहभाग लाभला आणि कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment