किनवट : किनवट उपविभागातील अनुसूचित क्षेत्रा व्यतिरीक्त(पेसा) ४१ गावांतील पोलीस पाटल पदांचे संवर्गनिहाय आरक्षण तहसील कार्यालयात दहा वर्षीय विनायक पावडे या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढून नुकतेच जाहीर करण्यात आले. या वेळी सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, माहूरचे प्रभारी तहसीलदार कैलास जेठे, नायब तहसीलदार अनिता कोलगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागा गेल्या अनेक वर्षांपासून भरण्यात आल्या नव्हत्या. पोलीस व महसूल प्रशासनाला या रिक्त जागांमुळे दैनंदिन कामकाजासाठी माहिती मिळत नव्हती. महसूल व पोलीस विभागातील महत्वाचा दुवा म्हणून गावपातळीवर पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावतात. गावातील अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती देणे, गुन्ह्यांच्या तपासात मदत करणे, गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम पोलीस पाटलांना करावे लागते. या पार्श्वभूमीवर जे पोलीस पाटील जिल्ह्यात कार्यरत होते, त्यांच्यावर चार-पाच गावांची जबाबदारी असल्यामुळे त्यांची जीवघेणी कसरत होत होती. त्यासाठी पोलीस पाटील संघटनेने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे, अखेर राज्य शासनाने या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
या अनुषंगाने किनवट उपविभागातील (किनवट व माहूर तालुक्यातील) घोषित झालेल्या ४१ गावांचे आरक्षण प्रवर्ग पुढील प्रमाणे असून, समोर गावाचे नाव व कंसात तालुक्याचे नाव आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी १- गुंडवळ (माहूर), अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी ३ – भिसी, मूळझरा व पांगरी (किनवट), अनुसूचित जमाती महिलांसाठी १- इरेगाव (किनवट), अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी ३ – नंदगाव, चिखली ई.,वाळकी बु. (किनवट), विमुक्त जाती (अ) महिलांसाठी १- व्यंकटरामनाईक तांडा (किनवट), विमुक्त जाती (अ) सर्वसाधारणसाठी १ – गोंडजेवली (किनवट), भटक्या जमाती (ब) सर्वसाधारणसाठी १ - अमलापूर(किनवट), भटक्या जमाती (ब) महिलांसाठी १- आंदबोरी ई. (किनवट), भटक्या जमाती (क) सर्वसाधारणसाठी १ - वाळकी खु.(किनवट), भटक्या जमाती (क) महिलांसाठी १-शिवूर (माहूर), भटक्या जमाती (ड) सर्वसाधारणसाठी १ - दत्तमांजरी (माहूर), इतर मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी ६ - लखमापूर, हिवळणी, मेट (सर्व माहूर) व कोसमेट, मार्लागुंडा, गोंडेमहागाव (सर्व किनवट), इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी २ - मानसिंगनाईक तांडा (किनवट), लिंबायत (माहूर), विशेष म्हणजे ओबीसी (इमाप्रवर्ग) च्या एकूण नऊ जागा होत्या. त्यातील आठ जागा वरील प्रमाणे आरक्षित झाल्या. मात्र, माहूर तालुक्यातील लखमापूर तांड्यामध्ये ‘ओबीसी’ ची लोकसंख्या नसल्यामुळे ही एक जागा रिक्त राहिली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलासाठी १ - आसोलीतांडा (माहूर), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्वसाधारणसाठी ३ – कंचली (किनवट), कासारपेठ व बोरवाडी (माहूर), खुला प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी ९ – बुरकुलवाडी, दीपलानाईकतांडा, दयाळधानोरा व गोंडजेवली (सर्व किनवट), नेर, आसोली, ईवळेश्वर, हडसणी, लांजी(सर्व माहूर), आणि खुला प्रवर्गातील महिलांसाठी ४ – दयाळधानोरातांडा, मलकजामतांडा, रिठातांडा (सर्व किनवट) व मांडवा (माहूर).
या वेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अमोल वाघाडे व कांबळे यांचेसह तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी व आरक्षण सोडतीसाठी आलेले नागरीक उपस्थित होते.
‘‘नांदेड जिल्ह्यातील सात उपविभागांतर्गत ‘पोलीस पाटील’ पदाच्या एकूण ८२९ रिक्त जागा भरण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून १ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ८ जानेवारी ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पोलीस पाटील पदासाठी १४ जानेवारी रोजी एक तासाची ८० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतरच गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे या पोलीस पाटील पदासाठी जिल्ह्यातील अनेक गावांतून स्पर्धा वाढणार आहे. पहिल्यांदाच लेखी परीक्षेद्वारे पोलीस पाटील पदांची भरती होत आहे. त्यामुळे उमेदवारांना आता या परीक्षेची कसून तयारी करावी लागणार आहे.’’
No comments:
Post a Comment