शेतकऱ्यांच्या मालाला कधी मिळणार योग्य भाव ? सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकरी त्रस्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 January 2024

शेतकऱ्यांच्या मालाला कधी मिळणार योग्य भाव ? सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकरी त्रस्त

किनवट : शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त  झाले आहे. सरकारची उदासीनता याला जबाबदार असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. 

   अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत शेतकरी शेती करतो. त्यातही शेतीप्रयोगी खाद्यान्नाच्या किमती शिखरावर, मजुरीच्या दरात वाढ, वाहतुकीच्या खर्च करूनसुद्धा पिकविलेल्या मालाला कमी भावात बाजारात विकावे लागते. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकटाच्या सामना करण्याची वेळ आली आहे.एकीकडे सल्फेट, युरिया आणि फवारणीच्या औषधांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच मजुरीचे दर वाढले आहेत. वाहतुकीचा खर्च न परवडणारा तरीही कशी तरी शेती करून कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. तरीही शेतातील मालाला योग्य तो भाव मिळत नाही.

नाइलाजाने शेतकऱ्यांना कमी

किमतीत शेतमाल विकून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

मागील काळात कापसाला बऱ्यापैकी

भाव मिळाला होता. मात्र, या वेळी

कापसाला हमी भावापेक्षाही कमी भाव

मिळत आहे. शेतातील मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर शेती करावी तरी कशी,असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.यातून आत्महत्येसारखा मार्ग शेतकरी स्वीकारत आहेत.

|| नोकरी आणि रोजगार मिळत नसल्यामुळे शेती करण्याशिवाय पर्याय  नाही. त्यातही शेतीमधून उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी. यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे सरकारचे आर्थिक धोरण शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.||

-  रत्नाकर मुनेश्वर, शेतकरी,अंबाडी 

No comments:

Post a Comment

Pages