सिद्धार्थ महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 January 2024

सिद्धार्थ महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

नांदेड(प्रतिनिधी) :-

        आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि मराठी वर्तमान क्षेत्रातील दर्पण पक्षिकाची सुरुवात या निमित्त पत्रकार दिन राज्यभर पत्रकार दिन साजरा केला जातो. या औचित्यावर आज (6 जाने) रोजी सिद्धार्थ महाविद्यालयात पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भारत दाढेल(उपसंपादक,लोकमत) भैय्यासाहेब गोडबोले(जिल्हा प्रतिनिधी, दैनिक बहुजन वार्ता), यांचा सत्कार आणि मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

         यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.संदीप गोनारकर होते. प्रमुख पाहुणे ऍड.विजय जे. गोणारकर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील संधी आणि आव्हाने यावर त्यांनी मार्गदर्शन केले. 

        पुढे बोलताना ऍड. विजय गोणारकर सर म्हणाले की, माध्यम क्षेत्र हे फक्त रोजगाराचे साधन नाही तर सामाजिक विकासाचे माध्यम म्हणून वापर केल्यास समाज विकसित होण्यास पत्रकारांचे योगदान महत्वाचे ठरेल.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघकारक कांबळे संचालन धनश्री गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी ज्ञानदीप कांबळे, गजानन टॉम्पे, संघरत्न सोनाळे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages