बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणच्या माध्यमातुन समाज जागृतीचे काम केले- आनंद भालेराव यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 January 2024

बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणच्या माध्यमातुन समाज जागृतीचे काम केले- आनंद भालेराव यांचे प्रतिपादन

किनवट : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पहील्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटीश काळात समाज जागृतीचे काम केले असे प्रतिपादन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख व किनवट टुडेचे संपादक आनंद भालेराव यांनी केले.


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डीटी आंबेगावे व जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व पत्रकारांच्या वतीने पुष्प वाहण्यात आले.पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये दर्पण वृत्तपत्र काढले व ब्रिटिश राजकर्त्यांना समाजाची समस्या सांगितली व देशभर कार्य केले .यानंतर तालुक सचिव राजेश पाटील यांनी जांभेकर यांच्या जिवन कार्यवार प्रकाश टाकला व महाराष्ट्रात व देशात अनेक थोर महापुरुषांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून लिखाण करून वृत्तपत्राचीमुहुर्तमेढ रोवली या मध्ये लो.बाळगंगाधर टिळक , गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विदा सावरकर, महात्मा गांधी आदी थोर समाज सुधारकांनी कार्य केले ते सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद भालेराव होते तर प्रस्तावना ता. अध्यक्ष नसीर तगाले यांनी मांडली , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले तर आभार युवा ता. उपाध्यक्ष विशाल गिमेकर यांनी मानले यावेळी ता. कार्याध्यक्ष सय्यद नदीम सह अनेक पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages