रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी राहुल वडमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 27 January 2024

रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी राहुल वडमारे


छत्रपती संभाजीनगरः रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी राहुल जी. वडमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी वडमारे यांची ही नियुक्ती केली आहे.

राहुल वडमारे हे गेल्या ९ वर्षांपासून रिपब्लिकन बहुजन सेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांच्यावर आता मराठवाड्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिपब्लिकन बहुजन सेनेचे दोन दिवसिय ९ वे राष्ट्रीय अधिवेशन २० आणि २१ जानेवारी रोजी खंडाळा येथे संपन्न झाले. या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात वडमारे यांची मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुस्ताक मलिक, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्रीमती संजिवनी लोखंडे, उत्तर प्रदेशचे अध्यक्ष संजय गौतम, उत्तर प्रदेशचे सचिव बाबर खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजरन्त गायकवाड, विदर्भ अध्यक्ष महेंद्र गवई, शैक्षणिक विभागप्रमुख व्यंकटेश कांबळे, किशोर लासूरे महाराष्ट्र राज्य संघटक, सुनील जैस्वार कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,बाबू शेख ठाणे जिल्हा संघटक आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages