नगरपरिषद किनवट च्‍या वतीने वसंतराव नाईक बाल उद्यान परीसरात श्रमदान व स्‍वच्‍छता अभियान संपन्‍न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 May 2024

नगरपरिषद किनवट च्‍या वतीने वसंतराव नाईक बाल उद्यान परीसरात श्रमदान व स्‍वच्‍छता अभियान संपन्‍न

 किनवट:

माझी वसुंधरा व स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत नगरपरिषद किनवट च्‍या वतीने मुख्‍याधिकारी श्री.मुगाजी काकडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक बाल उद्यान साईनगर येथे दि.८/०५/२०२४ रोजी श्रमदान व स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले. पावसाळयापुर्वी उद्यानात वाढलेली झुडपे, गवत, झाडांच्‍या फांद्या इत्‍यादींची छटाई करण्‍यात येऊन झाडांचा पाला-पाचोळा संकलीत करण्‍यात आले. सकाळी 7.00 वाजता सुरु करण्‍यात आलेल्‍या अभियानात नगर परिषद किनवट चे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, साईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.सुनील येरेकार, श्री. अजय कदम श्री. संजय धोबे माहेर दवाखान्याचे डॉ. राठोड यांच्‍या टिमने सहभाग नोंदिवला.

 श्रमदान अभियानाच्‍या प्रसंगी मुख्‍याधिकारी श्री.काकडे यांनी शहरवासियांना अहवान करत शहरात असलेल्‍या साईनगर व सुभाषनगर येथील असलेल्‍या उद्यानांचा नागरीकांनी व्यायाम, मनोरंजन, इत्‍यादी कार्यक्रमासाठी जास्‍तीत जास्‍त उपयोग करुन घ्‍यावा असे मत व्‍यक्‍त केले. सदरील उपक्रमात पा.पु. व स्‍वच्‍छता अभियंता श्री.अशोक भालेराव, कार्यालयीन अधिक्षक अर्चना भिसे, अभियंता अभिजित मिरकले, राहुल सातुरवार, स्‍टॅलिन आडे, राजू पिल्लेवार, विजया वाघमारे, तोफीक खान, अब्दुल अल्ताफ, सटवाजी डोकळे, परमेश्वर काचमोडे, किरण कलगोटुवार, फारुख सत्‍तार, स.जमिर, शेख रियाज, लक्ष्मण कोल्हे,अब्दुल रज्जाक,निखिल वाघाडे, शंकर शिवन्‍ना, व्‍यंकटेश मुकनेपेल्‍लीवार, साहील काशेटवार, दत्‍ता कोल्‍हे, रजनिकांत राईंचवार, किरण दुधीवार इ. सहभाग नोंदविला. No comments:

Post a Comment

Pages