किनवट : माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत नगरपरिषद किनवट च्यावतीने मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक बाल उद्यान साईनगर येथे बुधवारी (दि.08) श्रमदान व स्वच्छताअभियान राबविण्यात आले.
यात पावसाळयापूर्वी उद्यानात वाढलेली झुडूपे, गवत, झाडांच्या फांद्या इत्यादींची छाटणी करण्यात येऊन झाडांचा पाला-पाचोळा, कचरा आदी संकलित करण्यात आला. सकाळी सात वाजता सुरु करण्यात आलेल्या या अभियानात किनवट पालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगारांसह साईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.सुनील येरेकार, अजय कदम, संजय धोबे, डॉ. राठोड यांच्या काही कर्मचाऱ्यांनी आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
या प्रसंगी मुख्याधिकारी काकडे यांनी शहरातील साईनगर व सुभाषनगर येथील सुंदर उद्यानांचा नागरिकांनी व्यायाम, मॉर्निंग वॉक आदीसाठी तर ज्येष्ठ नागरिकांनी पहाटे व सायंकाळी निवांत फेरफटका मारण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन केले. सदर स्वच्छता मोहिमेत पालिकेचे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता अशोक भालेराव, कार्यालयीन अधीक्षक अर्चना भिसे, अभियंता अभिजित मिरकले, राहुल सातुरवार, स्टॅलिन आडे, राजू पिल्लेवार, विजया वाघमारे, तौफिक खान, अब्दुल अल्ताफ, सटवाजी डोकळे, परमेश्वर काचमोडे, किरण कलगोटुवार, फारुख सत्तार, स.जमीर, शेख रियाज, लक्ष्मण कोल्हे, अब्दुल रज्जाक, निखिल वाघाडे, शंकर शिवन्ना, व्यंकटेश मुकनेपेल्लीवार, साहिल काशेटवार, दत्ता कोल्हे, रजनीकांत राईंचवार, किरण दुधीवार यांनी सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment