ठाणे: डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसियेशन यांच्या वतीने क्रांतिकारी लेखक बाबुराव बागुल यांच्या स्मृती दिनानिमित्त डॉ. म. ना.वानखेडे स्मृती पुरस्कार प्रा.भाऊ लोखंडे नागपूर यांना (मरणोत्तर) प्रा. म भि.चिटणीस स्मृती पुरस्कार,क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी सांगली यांना (मरणोत्तर) तसेच विद्रोही,क्रांतिकारी लेखक यांच्या स्मृती प्रित्यर्थ ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्याचे गाढे अभ्यासक,ऐतिहासिक दस्तेवजाचे संग्राहक रमेश तुकाराम शिंदे (मुंबई) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला .या मध्येअसंघटित कामगारांचे जेष्ठ नेते ऍड एम. ए. पाटील,बाबुराव बागुल (आबा) यांचा जवळून सहवास लाभलेले डॉ.संजय रत्नपारखी, प्रा.रामप्रसाद तौर, प्रा.कुसुम त्रिपाठी, जेष्ठ कवी साहित्यिक शिवा इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बाबुराव बागुल यांच्या तसबिरी स पुष्पहार घालण्यात आला .अनेक मान्यवरांनी पुष्प वाहून आदरांजली वाहिली .याच वेळी दिवंगत पँथर गंगाधर गाढे यांना सर्व सभागृहाणे दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहिली.प्रास्ताविकात ऍड.नाना अहिरे यांनी पुरस्कार देण्या विषयी संस्थेच्या वतीने भूमिका मांडली.पुरस्कार प्राप्त रमेश शिंदे यांनी आपले मनोगत विविध चळवळी ,घटना ,विषद करत हे पुरस्कार वितरण चळवळीत येणाऱ्या,सहितिक क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या युवकांना मैलाचा दगड ठरावा असे म्हणाले.या वेळी ठाण्यातील जेष्ठ आंबेडकरवादी कवी राजरत्न राजगुरू,वसंतराव हिरे,अंकुश पडघम (बुलढाणा),राजाभाऊ रावल,बाळासाहेब जोंधळे यांनी आपल्या परिवर्तनवादी कविता सादर करून कार्यक्रमाची महती वाढवली .सूत्रसंचालन सुधाकर सरवदे यांनी उत्तम रित्या केले.
पुरस्कार वितरण समारंभ यशस्वी करण्यासाठी भटयु जगदेव,भास्कर बोराळे,माधुरी मोहिते ,पत्रकार भिमराव शिरसाट यांच्या सह असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. यंदाचे तिसरे वर्ष असून पुढील वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये महिलांचा ही सहभाग असेल असे सांगून ऍड.नाना अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले .या पुरस्कार वितरण समारंभासाठी ठाण्यातील पत्रकार ,लेखक ,कवी,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment