किनवट : प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निधीच्या पाच टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च करण्याचा नियम असताना तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा निधी खर्च केला जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असलेले पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव दिव्यांगांना न्याय देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१मधील अनुसूषी २ मध्ये नमूद केल्यानुसार पंचायत समितीच्या स्वउत्पन्नातून पंचायत समितीने वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाच्या (अपंग/दिव्यांग) व्यक्ती अधिनियम कायदा २०१६ मधील अधिनियम ३७ अन्वये दिव्यांगांना विविध योजनांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यामध्ये
दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती, ग्राम पंचायतने स्वनिधीतून म्हणजेच आपल्या उत्पत्रातून दिव्यांगांना वैयक्तिक ५०% व सामूहिक ५०% अशा स्वरुपाच्या विविध प्रकारच्या योजनांवर निधी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र, तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींना याचा विसर पडला असून एक प्रकारे दिव्यांग बांधवांची पायमल्ली होताना दिसते. तसेच दिव्यांग कायद्यानुसार जर ५% निधी स्थानिक
स्वराज्य संस्थांनी त्या वित्तीय वर्षात खर्च केला नसेल तर त्यांना तो निधी जिल्हा दिव्यांग खर्चात जमा करावा लागतो. मात्र, प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. तसेच दिव्यांगांना ग्राम पंचायतव्या विविध योजनांमध्ये जसे घरकुल, शौचालय, नळ पाणी पुरवठा, आदीमध्ये पाच टक्के आरक्षण तसेच ग्राम पंचायतकडून आकारण्यात येणाऱ्या करामधून ५०% सवलत अशा अनेक योजनांना तालुक्यामध्ये हरताळ फासल्याचे दिसत आहे.
||दिव्यांगांना न्याय देण्याची मागणी||
किनवट पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी म्हणून लाभलेले
पुरुषोत्तम वैष्णव यांनी प्रशासन कामाला लावल्याने जनमानसात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी ठोस पावले उचलून तालुका प्रशासन आणि ग्राम पातळीवर ग्राम पंचायत यांना दिव्यांगांचा हक्काचा पाच टक्के निधी खर्च करण्यास भाग पाडून जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी किनवट तालुक्यातील समस्त दिव्यांग बांधव करीत आहेत.
|| तालुक्यातील ग्राम पंचायतींनी दिव्यांगांच्या हक्काचा ५% निधी खर्च करून दिव्यांगाना न्याय द्यावा.||
- भगवान मारपवार, अध्यक्ष,प्रहार दिव्यांग संघटना,किनवट
|| तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतने दिव्यांगांसाठी वैयक्तिक अथवा सामूहिक प्रकारचा लाभ दिलेला नाही दिव्यांगांच्या हक्काचा ५% निधी ग्राम पंचायतने खर्च करून दिव्यांगांना मदत करावी.||
- मिलिंद सर्पे, अध्यक्ष, सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट,किनवट
No comments:
Post a Comment