उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ई.१२ वी परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचीु गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 22 May 2024

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ई.१२ वी परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचीु गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम !


किवनट:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) 

बारावीच्या परीक्षेचा निकाल  राज्य शिक्षण मंडळाकडून दिनांक २१/०५/२०२४ रोजी परीक्षा मंडळाच्या विहित कार्यपध्दती नुसार ऑनलाईन जाहीर करण्यात आला.


यामध्ये मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी, व्दारा संचलित, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा किनवट ने याही वर्षी आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे.


महाविद्यालयाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेतुन  एकुण ४२२ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते पैकी ४१८ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले.९९.०५ टक्के निकाल हा विज्ञान शाखेचा लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) २४४,(७५%पेक्षा जास्त) ५९, (८५%पेक्षा जास्त) ०७ एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले. 


विज्ञान शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.येरेकार आराध्या अनिलकुमार -८९.३३% ही प्रथम,पाटील वेदांत बापुजी ८८.५०% हा व्दितीय तर येरवाळ विनायक देविदास याने ८७.५०% गुण घेवून तृतीय क्रमांक  पटकावला आहे. विज्ञान शाखेतुन उच्च गुण प्राप्त करणारे विद्यार्थी घुले यश रामराव-८६.००% , कु.भालेराव केतकी जगदीश-८५.३३% , कु.राठोड वैष्णवी विनोद-८५.३३% , कु.मारकवाड ऋतिका सुनिल-८५.१७% ,कु.वाघमारे पूनम बंडू-८४.५०% ,कु.खान पठाण सादिया याकूब-८३.३६% ,राठोड अर्पित संतोष-८३.३३% ,सुर्यवंशी आदित्य नागनाथ-८२.१७% ,कु.झोयबा उमम मो.आतिख-८१.८३% ,कु.अकबानी सादिया मो.ईरफान- ८१.८३% ,कु.दानखडे भुमिका पवन-८१.५०% , कु.तुबा सोहदा मो.नासिर तगाले- ८१.३३%, उघडे सुरज संजय-  ८१.३३% यांनी यश संपादन केले आहे. ॲनिमल सांयन्स या विषयात १०० पैकी १०० गुणांसह आडे ज्ञानेश्वर नामदेव याने विशेष प्राविण्य मिळवले आहे.


कला शाखेतुन  एकुण १९९ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते पैकी १७६  विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. ८८.४४% टक्के निकाल हा कला शाखेचा लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) ६७ ,(७५%पेक्षा जास्त) १० , (८५%पेक्षा जास्त) ०२ एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले. 

कला शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.सुंकरवार  रेणुका राजू -८९.८३% ही प्रथम,कु.मुंडे रिया मनोहर ८५.१७% ही व्दितीय कु.गित्ते पल्लवी  काशिराम हिने ८३.८३%  गुण घेवून तृतीय क्रमांक  पटकावला आहे. कला शाखेतुन उच्च गुण प्राप्त करणारे विद्यार्थी कु.गोदरे अक्षदा सारंग -८२.८३% , कु.कांबळे सम्यका भगवान -८२.६७% , कु.गित्ते भाग्यश्री चंद्रकांत-७९.६७% , कु.कागणे नम्रता प्रमोद -७७.१७% ,कु.साबळे अंजना सुंदरसिंग-७७.१७% ,कु.राठोड प्रतिक्षा लखन-७५..८३% ,कु.भरकाडे भावना केशव-७५.३३% ,कु.गायकवाड रविना काशिनाथ ७५.३३% , यांनी यश संपादन केले आहे.शिक्षणशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुणांसह कु.मुंडे रिया मनोहर हिने विशेष प्राविण्य मिळवले आहे.


 संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए.पी.जुगगरे,उपप्राचार्य.आर.ए.

जाधव, उपमुख्याध्यापक पी.जी.मुनेश्वर, पर्यवेक्षक प्रा.एस.ए.बैसठाकुर, पर्यवेक्षक किशोर डांगे, पर्यवेक्षक सुभाष सुर्यवंशी,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.आर.व्ही.इंगळे व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages