अवैध सागवानासह 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 June 2024

अवैध सागवानासह 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

किनवट : वनविभागाच्या गस्तीपथकाने शनिवारी गोकुंदा मार्गावर  संशयावरून एका चार चाकी वाहनातून लाकडी फर्निचरसाठी अवैध कटसाईज सागवानाची तस्करी करतांना पकडून वाहन व अवैध सागवानासह एकूण 44 हजार 616 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तस्कर मात्र कार सोडून पसार होण्यात यशस्वी झाले.


वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.15) वनविभागाचे गस्तीपथक गोकुंदा ते चिखली मार्गावर गस्त घालीत असतांना,  किनवटकडे येणाऱ्या एक पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारबद्दल (क्र.एमएच 26 ए 7740) संशय आल्यावरून त्याचा पाठलाग सुरू केला असता, चालकाने वेगाने गाडी चालवीत एका आडमार्गाला गाडी सोडून सर्व तस्कर पळून गेले. त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात 0.2188 घनमिटर भरलेले सागवान पलंगासाठी उपयोगात येणारे सागाचे कटसाईज 21 नग आढळून आले. ज्याची बाजार भावाप्रमाणे 4 हजार 616 रुपये किंमत होते. कारची किंमत अंदाजे 40 हजार रुपये धरून अवैध सागवानासह एकूण 44 हजार 616 रुपयांचा मुद्देमाल वनपथकाने जप्त करून आगारात जमा केला आणि या अज्ञात आरोपींविरुद्ध वन गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


 सदर कार्यवाहीत उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल.राठोड  यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचे वनपरिमंडळ अधिकारी एम.एन.कतुलवार  एस.एम. कोम्पलवार, वनरक्षक एस.एम.यादव अनिल फोले, बी. एस. झंपलवाड, ओ. एन. शिंदे, व्ही. एस. मुळे तसेच वाहन चालक  बाळकृष्ण आवले व शेख नूर  यांचा सक्रीय सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Pages