लोणी शाळेतील इयत्ता पहिलीत प्रवेशीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात केले स्वागत ; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि शालेय पोषण आहार वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 June 2024

लोणी शाळेतील इयत्ता पहिलीत प्रवेशीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात केले स्वागत ; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि शालेय पोषण आहार वाटप


किनवट ( बातमीदार ) : कमठाला केंद्रांतर्गत लोणी शाळेत पहिल्याच दिवशी  इयत्ता पहिली प्रवेशित मुलांचे बाईक रॅली काढून फुगे, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार आणि पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.      

            शाळा प्रवेश उत्सव झाला पाहिजे या उद्देशाने शासनाने शाळा प्रवेश पंधरवडा आणि पहिल्या दिवशी विविध उपक्रमाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे धोरण अवलंबले. त्या अनुषंगाने किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे पहिलीत प्रवेशीत मुलांचे बाईक वरून गावातील प्रमुख मार्गाने ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. शिक्षकांच्या मोटारसायकल वर बसल्याने विद्यार्थीही आनंदीन दिसत होते. त्यानंतर शाळेत पुष्पगुच्छ चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. पाठ्यपुस्तकाचे वितरण पहिल्या दिवशी करून शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडी देण्यात आली. 

            यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर, अंकुश राऊत, विद्या श्रीमेवार, राहुल तामगाडगे या शिक्षकाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील गजानन लोंढे, मारोती बादड, हनमंत गुंजकर, निळकंठ गुंजकर, महेंद्र गुंजकर, कैलास सोळके, परमेश्वर गुंजकर, पांडूरंग गुंजकर, सुषमा सोळंके, सपना काळे आदी माता पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages