संयम सुटतोय ? शेकडो गाड्या वडीगोद्रीकडे‎ रवाना; कुठे रास्ता रोको तर कुठे गावच बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 June 2024

संयम सुटतोय ? शेकडो गाड्या वडीगोद्रीकडे‎ रवाना; कुठे रास्ता रोको तर कुठे गावच बंद

संभाजी नगर :

लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी‎बीड जिल्ह्यात परळीत वैद्यनाथ‎ सहकारी साखर कारखान्याच्या पांगरी‎ कॅम्प येथील चौकात, मंगळवारी रात्री‎ओबीसी बांधवांनी रस्त्यावर टायर‎पेटवत दोन तास रास्ता रोको आंदोलन‎केले. तर बुधवारी केज तालुक्यातील‎ हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे‎ रवाना झाले. शिरूर तालुक्यात हाके‎यांच्या समर्थनार्थ बुधवारी कल्याण ‎‎-विशाखापट्टणम् राष्ट्रीय‎ महामार्गावरील शृंगारवाडी येथे अर्धा‎तास रास्तारोको आंदोलन केले. केज ‎‎तालुक्यातून हाके यांच्या‎ आंदोलनासाठी १ लाख ११ हजार‎ रुपयांची मदत करण्यात आली.


ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी उपोषणास‎बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे‎यांच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल न ‎घेतल्याने, ओबीसी बांधव संतप्त झाले अाहेत.‎बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी धुळे-सोलापूर‎महामार्गावर टायर जाळून आंदोलकांनी रास्ता‎रोकोचा प्रयत्न केला. तर अंबड शहर दिवसभर बंद‎पाळण्यात आला. बुधवारी दिवसभरात १५ हजार‎समाजबांधवांनी वडीगोद्री येथे भेट देऊन या‎आंदोलनाला समर्थन दिले. यात एकट्या केज‎येथून दोनशे, पाटोदा येथून शंभर वाहने आली‎होती. हिंगोलीतूनही ४०० वाहनांनी ओबीसी बांधव‎वडीगोद्रीत आले. दिवसभरात एकूण ७०० पेक्षा‎जास्त वाहने वडीगोद्रीत आली होती. १३‎जूनपासून वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरु केले‎आहे. मंगळवारी सायंकाळी धुळे-सोलापूर‎महामार्गावर वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलन‎झाले होते. तर बुधवारी दुपारी पुन्हा संतप्त‎आंदोलकांनी याच महामार्गावर टायर जाळून रास्ता‎रोकोचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप‎केल्याने आंदोलक माघारी फिरले.‎


No comments:

Post a Comment

Pages