छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची बैठक 16 जुलै रोजी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत श्रीमती अलका गणेश जाधव यांची महिला जिल्हाध्यक्षपदी व जिल्हा सचिव पदी स्वातीताई सुनील घुसळे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय भैय्या सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हाअध्यक्ष मा.राहुल जी.वडमारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संघटक रतन जाधव यांच्या हस्ते हार व शॉल घालन्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महेंद्र गवई सर, श्रीमती व्दारका बाई कीर्तीशाई यांची होती.
या कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक सय्यद फईम यांनी केले, सुत्रसंचलन शहर अध्यक्ष अभिजित गवळी यांनी केले तर खूलताबाद उप तालुका अध्यक्ष बंडू तांदळे, द्वारका बाई भीमराव कीर्ती साई. रुखमन बाई राजेंद्र खोतकर. सविता भगवान शिरसाठ. केसरबाई किसन दिवेकर ,भागिनाथ म्हस्के, विजय काळे, मुक्तेश्वर थोरात, सचिन ठोकळ, अभिजीत गवळी, विशाल मंदेडवाढ, संदीप भैया तांगडे, काकासाहेब बडोगे, भैय्या सोपान थोरात, अनिस पटेल, आकाश थोरात, विकी तायडे, अमोल जोगदंडे या सह शहर जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर संघटक सय्यद फईम यांनी केले.
No comments:
Post a Comment