मूलभूत सुविधा पासून वॉर्ड दुर्लक्षित फुले कॉलनीच्या नागरिकांनी आमदार जैस्वाल यांच्या पुढे मांडल्या समस्या ; दोन दिवसात कामे मार्गी लावण्याचा दिला शब्द - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 16 July 2024

मूलभूत सुविधा पासून वॉर्ड दुर्लक्षित फुले कॉलनीच्या नागरिकांनी आमदार जैस्वाल यांच्या पुढे मांडल्या समस्या ; दोन दिवसात कामे मार्गी लावण्याचा दिला शब्द

छत्रपती संभाजीनगर :- येथील महात्मा फुले कॉलनी, गोगाबाबा टेकडीलगत,वामनदादा कर्डक सभागृह जवळील रहिवासी यांनी मूलभूत समस्या सोडविण्यासाठी 

 औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रदीप जैस्वाल यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

मागील वीस वर्षापासून महात्मा फुले कॉलनी येथे कुठल्याही सोयी सुविधा नसून फार मोठ्या प्रमाणात समस्या आहेत,यामुळे आमचे प्रचंड हाल होत आहेत,

 आमच्याकडे लहान मुले, वयोवृद्ध व आजारी नागरिक असल्यामुळे, आम्हाला रस्ता नाही,शहरात जाण्यासाठी प्रचंड अडचणी होत आहेत, तसेच चिखलतून वाट काढावी लागत असून, रस्त्यात मोठे खड्डे आहेत, ड्रेनेजचे पाणी रस्त्यात येऊन घरात येते, त्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत, आजार वाढत आहेत, रात्री-अपरात्री आम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे, तसेच पिण्याचे पाणी नसल्याने आमची फार  अडचण होत आहे,अशा प्रकारच्या विविध समस्या मांडल्या.

 लवकरात लवकर ड्रेनेज लाईन टाकावी,तात्काळ अंतर्गत पक्के रस्ते बनवावे व पाण्याची पाईपलाईन टाकावी व नळाची जोडणी करून पाण्याची समस्या सोडवावी, सर्व मागण्या ऐकून येत्या दोन दिवसात आमदार जैस्वाल यांनी पूर्ण करण्याचा शब्द देऊन मी स्वतः भेट देणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सुरेश जगताप, डॉ. मिलिंद आठवले, ऍड. गौतम कदम, रवींद्र वानखेडे, लता थोरात,प्रभाकर भवरे,नीलिमा पवार,त्रिभुवन काका, शोभा शेजवळ, हन्ना खंडागळे,महानंदा साळवे,डॉ.रामेश्वर वरशीळ तसेच ,चाबुकस्वार काका, डोंगरे मावशी व चतुराबाई सरकटे यांची यावेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages