नांदेड - येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वृक्षभेट देऊन साहित्य चळवळीतील कविंचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने मंडळाचे कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, राज्य कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, ज्येष्ठ कवी थोरात बंधू, आंबेडकरी कवी मुक्तीघोष सुर्यंकर, पत्रकार कुलदीप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. काव्यपौर्णिमा मालेतील जुलै २०२४ महिन्याची ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. यात अनुरत्न वाघमारे, पांडुरंग कोकुलवार, प्रज्ञाधर ढवळे, शरदचंद्र हयातनगरकर, थोरात बंधू, रणजित गोणारकर यांनी सहभाग नोंदविला तर आॅनलाईन पद्धतीने सटवाजी माचनवार, बाबुराव पाईकराव, जीवन मांजरमकर, उषाताई ठाकूर, प्रल्हाद घोरबांड, काशिनाथ महाजन आदींनी सहभाग घेतला. काव्य पौर्णिमा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment