किनवट : तहसील कार्यालय,किनवट येथे संजय गांधी निराधार योजनेचे प्रमुख तथा कर्तव्यदक्ष अधिकारी रामेश्वर मुंडे यांची पदोन्नती झाली असून, ते नुकतेच येथील उपविभांगीय कार्यालयामध्ये नायब तहसीलदार पदी रुजू झाले आहेत.
तहसील मधील आपल्या कार्यकाळात मुंडे यांनी शेकडो गोरगरीब निराधार महिलांना मार्गदर्शन करीत, निस्वार्थपणे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्यामुळे, ते कार्यालयासह जनसामान्यातही नि:स्पृह व मनमिळावू अधिकारी म्हणून लोकप्रिय होते. मागील कामाचा अनुभव त्यांना या नवीन जबाबदारीसाठी निश्चितच उपयोगी ठरेल असे मत त्यांना भावपूर्ण निरोप देतांना सहकाऱ्यांनी करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.
No comments:
Post a Comment