राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 5 August 2024

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

किनवट  : ब.पा. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांसाठी  हिंदी विभागातर्फे   प्राचार्य डॉ.एस .के .बेंबरेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.30 जुलै) आयसीटी हॉलमध्ये "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020" च्या संदर्भाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


  प्रारंभी डॉ. योगेश सोमवंशी यांनी केलेल्या प्रस्तावनेत सांगितले की, भारताला विश्वगुरू करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण असून, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, भाषा विषय हे संवाद कौशल्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे असून, आता मातृभाषेत सुद्धा आपणास शिक्षण घेता येणार आहे आणि अशी व्यवस्था या शैक्षणिक धोरणामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर  कार्यशाळेचे संयोजक डॉ गजानन वानखेडे यांनी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना असलेले वेगवेगळे विषय  आणि त्यांचे महत्त्व सांगून, श्रेयांक पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या धोरणामुळे होणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी विषय निवडीची लवचिकता घेऊन आलेला असल्याचे सांगितले. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान करण्यात आले. सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा. प्रल्हाद जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुलोचना जाधव यांनी केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी अनिकेत पहुरकर, रोहित ताडपेल्लीवार, सुधीर पाटील, प्रा . दयानंद वाघमारे, प्रा. सतीश मिरासे व उत्कृष्ट असे फलक लेखन दीपक खंदारे यांनी केले.

याप्रसंगी वाणिज्य विभागाच्या डॉ .एस .एल. दिवे, प्रा. अजय पाटील.  डॉ.रचना हिपळगावकर, मुळे सर आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेत मोठ्या संख्येन विद्यार्थी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Pages