भारत बंद आंदोलन समर्थनार्थ पुण्यात निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 21 August 2024

भारत बंद आंदोलन समर्थनार्थ पुण्यात निदर्शने

पुणे :

अनुसूचित जाती प्रवर्गासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयायाच्या विरोधात आज २१ऑगस्ट रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता.सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनीही भारत बंद आंदोलनाला समर्थन दिले.

पुणे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ आंबेडकरी चळवळीतील संविधानवादी  सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमावेत पुणे येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे  जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले तसेच पुणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले सदर आंदोलनात रिपब्लिकन कामगार सेना,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने सक्रिय सहभाग नोंदवला होता.



No comments:

Post a Comment

Pages