जीवनदीप मध्ये साहित्यिक आपल्या भेटीला कार्यक्रमांतर्गत रानकवी तुकाराम धांडे यांचा कवितांचा वर्षाव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 August 2024

जीवनदीप मध्ये साहित्यिक आपल्या भेटीला कार्यक्रमांतर्गत रानकवी तुकाराम धांडे यांचा कवितांचा वर्षाव

कल्याण :

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कल्याण ग्रामीण आणि जीवनदीप महाविद्यालय गोवेली यांच्या माध्यमातून साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी आदिवासी कवी तुकाराम धांडे ( रानकवी) यांना निमंत्रित करण्यात आले होते .शालेय अभ्यासक्रमात कवी तुकाराम धांडे यांच्या कविता समाविष्ठ असल्याने सबंधित शालेय विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . जि. प. शाळा गेरसे येथील विद्यार्थ्यांनी त्यांची रानवेडी ही कविता त्यांच्या समोर सादर केली तसेच कवी धांडे यांनी त्यांच्या कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या."माणसाने माय माती  या दोन गोष्टींना कधी ही विसरू नये तसेच कविता सभोवतालच्या निसर्गातून फुलून येते ,वास्तवावर भाष्य करते विचार करायला लावते"असेही त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. रवींद्र घोडविंदे सर उपस्थित होते .यांनी तुकाराम धांडे याचे स्वागत केले. तसेच लेखक गिरीश कंटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे कार्यवाह अनिल सुरोशी यांनी केले . सूत्रसंचालन सहकोशाध्यक्ष प्रा. नरेश टेंभे यांनी केले तर आभार सहकार्यवाह प्रा. हरेंद्र सोष्टे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कोषाध्यक्ष प्रा. प्रकाश रोहणे यांनी केले . प्रसंगी शाखेचे सदस्य , महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Pages