जीवनदीप महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्रीटूर्नामेंट संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 August 2024

जीवनदीप महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्रीटूर्नामेंट संपन्न

  

कल्याण : 

जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गत ठाणे विभाग क्रॉस कंट्री स्पर्धा २०२४ चे गोवेली येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला  आपल्या महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे तसेच  प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ ठाणे झोनचे सचिव श्री.राहुल अकुल, डॉ.यदनेश्र्वर बागराव, डॉ.चंद्रकांत म्हात्रे, डॉ.देवयानी लडे, गणेश मोरे ,सतीश राजगुरू यांची उपस्थिती लाभली.यावेळी श्री.रवींद्र घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन दिले तसेच श्री.राहुल अकुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या स्पर्धेसाठी २७ महाविद्यालयांचा सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा मुले व मुली अश्या दोन गटांमध्ये भरविण्यात आली. या स्पर्धेसाठी साधारण १७० विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्या स्पर्धेसाठी गोवेली महाविद्याल ते रुंदे गणेश विद्यालय असे  १० किलोमीटर चे  अंतर स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये मुलीत  साक्षी संजय जड्याळ (44:00)मि या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक कविता धांगडे(44:16)मि, तृतीय क्रमांक आदिती पाटील(45:12)मि, त्यानंतर मुलांमध्ये प्रथम क्रमांक(33:45:12)मि हिमाचंद्र निशांत हिमाचन्द्र यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक रोहन चौधरी(33:45:42)मि. तृतीय क्रमांक माणिक वाघ(34:28:60)मि. या विद्यार्थ्यांना मेडल क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप देऊन संबोधित करण्यात आले. तसेच एस. एस. टी  महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. त्याच प्रमाणे बी.के बिर्ला या महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक तर ए.सी.एस मोखाडा या महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. यांना ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आले. 

यावेळी या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ.के.बी कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. मोहनीश देशमुख इतर प्राध्यापक वर्ग तसेच स्पर्धेला उपस्थित असलेले इतर महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया देशमुख यांनी केले अशा या आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.



No comments:

Post a Comment

Pages