किनवट : येथील संविधान स्तंभ नुतनीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा नियोजीत जागेवर उभारणे संबंधी वंचित बहुजन आघाडीतर्फे काल(ता.२८)पासून संविधान स्तांभाजवळ बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.उपोषणाचा आज(ता.२९)दुसरा दिवस आहे.
यासंदर्भाने नगर परिषदेचे प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील जुन्या नगर परिषदेसमोर सन १९७२-७३ साली स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्याने उभारण्यात आलेला संविधान स्तंभ हा जिर्ण व मोडकळीस आल्या कारणाने सदरील संविधान स्तंभाचे सद्यास्थित ठिकाणी नुतनीकरण स्वंतत्ररित्या शासकीय प्रक्रीयेनुसार करण्यात यावे. तसेच नगर परिषदे मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्या संबंधी जिल्हाधिकारी, नांदेड यांनी जुना पुतळा होता त्याच जागेवर मान्यता दिली आहे. पंरतु, नगर परिषद प्रशासनाने १४ महिण्याचा कालावधी संपून सुध्दा नियोजीत जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्या संबंधी काम सुरु केले नाही. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील शिव आंबेडकरी, संविधान प्रेमी नागरीकांच्या वतीने ता .२८ पासुन संविधान स्तंभा जवळ बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे.
निवेदनावर विकास कुडमते अध्यक्ष विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य, निखील वाघमारे, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, किनवट,अब्दुल्ला चाऊस रहेनुमा - ए - कारवां ,किनवट,शेख नजीर शेख शरिफ (बावाभाई), दुधराम राठोड तालुका महासचिव ,वंचित बहुजन आघाडी,
राहुल कापसे व अभय नगराळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब, सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट व तहसीलदार किनवट यांना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment