खरीप पीकविमा योजनेत ८५ हजार ६०८ अर्ज किनवट तालुका : ६१ हजार ४३६ हेक्टरवरील पिके संरक्षित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 28 August 2024

खरीप पीकविमा योजनेत ८५ हजार ६०८ अर्ज किनवट तालुका : ६१ हजार ४३६ हेक्टरवरील पिके संरक्षित

किनवट  :  या वर्षीच्या खरीप हंगामात  गत १ ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील ३९ हजार ५९० शेतकऱ्यांनी ८५ हजार ६०८ पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची ६१ हजार ४३६ हेक्टरवरील विविध पिके विमा संरक्षित झाली आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


        नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांसाठी युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही विमा योजना राबविण्यात येत असून, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी या सहा पिकांसाठी ही योजना लागू आहे. किनवट तालुक्यातील एकूण ३९ हजार ५९० शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून तब्बल ८५ हजार ६०८ पीक विमा अर्ज बँका तसेच सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) तसेच पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून तर काही शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या देखील विमा अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार किनवट तालुक्यातील खरिपाच्या  ६१ हजार ४३६.४७  हेक्टरवरील पिकांसाठी ३ अब्ज २९ कोटी १८ लाख ३९ हजार ९९४.४३ रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतल्या गेले आहे. शेतकऱ्यांनी प्रति अर्ज  एक रुपयानुसार ८५ हजार ६०८ रुपये विमा हप्ता भरला आहे. राज्य शासनाच्या हिश्शाचा २९ कोटी ६० लाख १२ हजार ७५४.६९ रुपये व केंद्र शासनाच्या हिश्शाचा २० कोटी २४ लाख ६१ हजार ६५१.२९ रुपये विमा हप्ता आहे. राज्य व केंद्राचा हिस्सा व शेतकऱ्यांचा हप्ता एकत्रित करून एकूण ४९ कोटी ८५ लक्ष 60 हजार ०१३.९८ विमा हप्ता युनायटेड कंपनीकडे जमा करण्यात आलेला आहे. या ८५,६०८ आलेल्या विमा अर्जामध्ये ३ हजार ४३१ किरकोळ, १ हजार ७१३ इतर तर ८० हजार ४६४ हे लहान शेतकरी असून, यात ३ हजार ९१३ अनुसूचित जातीचे (एससी), १५ हजार २९९ अनुसूचित जमातीचे (एसटी), ३४ हजार ३५८ हे ओबीसी तर ३२ हजार ०३८ हे जनरल कॅटेगरीतील आहेत.


       ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीक उत्पादनालाही फटका बसतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ठराविक रक्कम भरावी लागत होती. सोबत राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा; पण राज्य शासनाने गेल्या वर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.


किनवट तालुक्यातील महसूलमंडळनिहाय पीकविमा अर्ज स्थिती


         ( विमा संरक्षित क्षेत्र हेक्टरमध्ये )


महसूल मंडळ


पीक विमा अर्ज


विमा संरक्षित क्षेत्र


बोधडी


११,०६७


 ८,१८६.४२


दहेली


०८,२९०


 ६,७१८.९५


इस्लापूर


१३,९८७


 ९,६३२.७०


जलधारा


०८,८३७


 ६,२४९.७५


किनवट


०८,०६९


 ६,३०९.०१


मांडवी


०७,३४६


 ५,५९७.४३


शिवणी


११,११६


 ७,४१०.७४


सिंदगी मोहपूर


०८,३१३


 ६,०४७.३१


उमरी बाजार


०८,५८३


 ५,२८४.१६


एकूण


८५,६०८


६१,४३६.४७


No comments:

Post a Comment

Pages