नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 August 2024

नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

नांदेड :

नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तसंच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. 


नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला होता. तसंच, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता.


No comments:

Post a Comment

Pages