किनवट,ता.२ : सर्वहारा शोषितांच्या वेदना मांडणारं, वर्ण, वर्ग व्यवस्थेच्या विरोधात लढण्यास सम्यक क्रांतीचा संदेश देणारं , मन, मनगट , मेंदूला आकार देणारं, प्रेम वात्सल्य , विवेक , श्रद्धा, समर्पण , शील , सौंदर्य याचा सूचकपणे अविष्कार करणारं , लढवय्ये नायक निर्मिणारं साहित्य निर्माण करणारे विश्व साहित्याचे कुलदीपक म्हणजे अण्णाभाऊ साठे , असे प्रतिपादन उदयगिरी महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले.
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील पुतळा परिसरात आयोजित केलेल्या लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. माजी आमदार प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव केराम, प्रा. रामप्रसाद तौर मंचावर उपस्थित होते.
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मारोती सुंकलवाड यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, व्यंकटराव नेम्माणीवार , के. मूर्ती , अरुण आळणे , आनंद मच्छेवार , पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला, सचिन नाईक , वैजनाथ करपुडे पाटील , पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार , प्रा. किशन मिरासे, माजी उपनगराध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार , अभय महाजन , बसपा महाराष्ट्र प्रदेश नेते प्रा.डॉ. आनंद भालेराव, पीएम पोषण योजना अधिक्षक अनिल महामुने , रिपाइंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार , माधव कावळे , सुरेश जाधव , बाजार समिती संचालक राहूल नाईक, माजी सभापती प्रेमिला सुंकलवाड , उषा धात्रक , भावना दिक्षित , शोभा कुलसंगे , दत्ता आडे, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील , प्राचार्य डॉ. आनंद भंडारे , प्रा. डॉ. पंजाब शेरे , प्रा. डॉ.एस.आर. शिंदे , पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पोहरकर , फुलाजी गरड , प्रदीप वाकोडीकर , ऍड. मिलिंद सर्पे , अनिल भंडारे, किरण ठाकरे , संतोष सिसले , जयपाल जाधव , बबन वानखेडे , ऍड . हरि दर्शनवाड , कॉ. प्रभाकर बोड्डेवार , किशनराव कयापाक , किसन राठोड , अतुल दर्शनवाद , अजय कदम , प्रशांत कोरडे , निराधार योजना समिती अध्यक्ष मारोती भरकड , प्रा. दगडू भरकड , कुणबी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सर्व मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. आमदार भीमराव केराम यांनी ध्वजारोहन केले व समयोचित भाषण केले. ऍड. हरि दर्शनवाड यांच्या वतिने १० वीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी घडविल्याबद्दल निवृत्त प्राचार्य राजाराम वाघमारे , प्रबोधन चळवळीतीले शिलेदार चे लेखक महेंद्र नरवाडे यांचा आ. भीमराव केराम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार , मधुकर अन्नेलवार , गंगाधर मुकनेपेल्लीवार , रवि ऊप्परवार, नरेश माहुरकर , राजू कोत्तुरवार , रमेश दिसलवार ,रवी आईदावार , भगवान मारपवार किशोर देवतळे ,शंकर भंडारे , नागनाथ भालेराव, किशोर बोलेनवार , दत्ता पिल्लेवार , प्रदीप दोनकोंडवार, रमेश राशलवार , कामराज माडपेल्लीवर आदिंनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment