साने गुरुजी रुग्णालयाच्या महिला आरोग्य अभियानाचा १५० रूग्णांनी घेतला लाभ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 2 August 2024

साने गुरुजी रुग्णालयाच्या महिला आरोग्य अभियानाचा १५० रूग्णांनी घेतला लाभ


किनवट  : भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरूजी रूग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी (सिं)(ता.किनवट)अंतर्गत उपकेंद्र पळशी येथे पळशी परीसरातील १५० रुग्णांनी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार व योग्‍य मार्गदर्शन सेवेचा लाभ घेतला. 

    यात स्त्रिरोग विभाग २१, नेत्ररोग २७, दंतरोग चिकीत्सा २२, फिजिओथेरेपी ९०, रक्त तपासणी ४०,  वयोवृध्द महिला पुरूष १७, बालके २१, युवती २६, शस्त्रक्रिया करण्यायोग्य २६  रूग्णांनी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन औषधी उपचार घेतला व पुढील उपचार योग्य सल्ला घेतला. या रुग्णांची साने गुरुजी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.  

       किनवट हा आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. तालुक्यातील लोकांचे आरोग्य अबाधित रहावे, त्यांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात व त्यापेक्षाही जास्त महत्वाचे त्यांचे आरोग्य प्रबोधन व आरोग्य शिक्षण व्हावे या हेतूने भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरूजी रूग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे (एम. एस. सर्जन) यांनी महिला आरोग्य अभियानाची सुरूवात केली.

  महिला आरोग्य अभियानाचे उद्घाटन पळशी गावच्या महिला सरपंच मंगला नैताम, स्त्री रोग तज्ञ डॉ. भाग्यश्री बेलखोडे - वरटकर, दंतशैल्य चिकित्सक डॉ. मानसी व्यवहारे यांच्या शूभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून केले. अभियानाची पार्श्वभूमी आरोग्य समूपदेशक डॉ. शिवाजी गायकवाड यांनी मांडली. यात त्यांनी किनवट तालुक्यातील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न, गरजा व उपलब्ध सोयी सुविधांचा लेखाजोखा मांडला. तसेच या अभियानाची गरज किती आहे हे लोकांच्या लक्षात आणून दिले.

   कुटुंबाच्या व कामाच्या विवेचनेमुळे कुटुंबासाठी सतत झटणारी महिला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाही, आजार अंगावर काढते, तीला चांगला आहार मिळत नाही. योग्य वेळी रूग्णालयात जात नाही व गेलीच तर तज्ञ डॉक्टरांकडे जात नाही, अशी खंत डॉ. अशोक बेलखोडे यांनी या प्रसंगी त्यांच्या मनोगतात व्यक्त करीत स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कॅन्सरसारखे आजार सुरुवातीलाच कसे ओळखावे या बददलची सविस्तर माहिती दिली. सोबतच सध्याच्या वैद्यकिय क्षेत्रात सुरु असलेले रुग्ण व नातेवाईक यांचे शोषण या बददल चिंता व्यक्त करीत रुग्णानांनी स्वत: शहाने होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. सोबत शासकीय आरोग्य सेवेंचा लाभ जन सामान्यानी प्रथम घ्यावा असेही सूचित केले.

   अभियानाच्या सुरुवातीला जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, पळसी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी महिला आरोग्य अभियानात आलेल्या तज्ञ डॉक्टरांचे पारंपरीक लेझीम वादयाच्या माध्यमातून स्वागत केले. साने गुरुजी रुग्णालयाच्या उपचारातून बरे झालेल्या व प्रसंगी जिवदान मिळालेल्या रुग्णांनी डॉ. अशोक बेलखोडे यांची भेट घेउन ऋण व्यक्त केले, सत्कार व सन्मान केले. या प्रसंगाने सर्व उपस्थित रग्ण, नातेवाईक आणि गावकरी भाउक झाले होते.    

  सदरील अभियानासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन काळे, डॉ. दीपा मेश्राम, आरोग्य कर्मचारी सुनिल वाघमारे व परीचारीका, आशा वर्ककर यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच साने गुरुजी रुग्णालय परीवारातील नेत्ररोग तज्ञ डॉ. पवार, डॉ. मधुसूदन यादव, डॉ. गेडाम, डॉ. भारती साबळे,  विपीन पवार यांनी रुग्णांची रक्त तपासणी केली.

  कार्यक्रमाच्यावेळी पत्रकार संदेश पाटील, मुख्याध्यापक राहुलवार, लचमा रेड्डी एल्टीवार, संजय रेडडी, शिक्षक अस्सलवार, संदुलवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

  अभियान यशस्वीतेसाठी साने गुरुजी रुग्णालय मित्रमंडळ, पळसीचे रमेश पडगीलवार, अजय वल्लेवार, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोठरी (सिं) चे आंगणवाडी ताई आशा ताई तसेच साने गुरुजी रुग्णालयाचे संजय बोलेनवार, अजय नरड, निखील साखरे, अजिंक्य कयापाक, नागेश देवतळे, अर्चना डोंगरे व रुग्ण सहाय्यक प्रशिक्षणार्थी प्रणाली निकोडे इत्यादींनी पुढाकार घेतला.


No comments:

Post a Comment

Pages