नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेत एम.के. टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 September 2024

नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेत एम.के. टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश !



किनवट : मनामध्ये जिद्द असेल तर कुठलेही कार्य कठीण नाही,अशाच प्रकारची प्रचिती नुकत्याच लागलेल्या नीट वैद्यकीय पात्रता परीक्षेच्या पहिल्या प्रवेश यादीतील निकालावरून स्पष्ट होते. योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावरती किनवट सारख्या आदिवासी, दुर्गम भागांमध्ये २ दोन वर्षांपूर्वी कार्यरत झालेल्या मातोश्री कमलताई ठमके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स, गोकुंदा(ता. किनवट)मधील विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत निवड होणे हे स्पष्ट करते,असे प्रतिपादन अभि. प्रशांत ठमके यांनी केले.

     आज(ता.२) महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये  निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.

 मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या शुभांगीताई ठमके, माजी प्राचार्य राजाराम वाघमारे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंबादास जुनगरे व रामराव घुले हे उपस्थित होते.

  एम.के.टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स चे विद्यार्थी सुयश प्रशांत ठमके यांने  नीट परीक्षेत ५९५ एवढे गुण घेऊन राजीव गांधी शासकीय वैद्यकीय

महाविद्यालय,ठाणे ,तर यश रामराव घुले यांने ५७७ एवढे गुण प्राप्त करून शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे पहिल्याच प्रयत्नात प्रवेश मिळवला असल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.

   वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी  प्रवेश मिळावा म्हणून अनेक विद्यार्थी नांदेड सारख्या जिल्ह्याचे ठिकाणी राहून लाखो रुपये खर्च करून डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतात. परंतु, आपले हे स्वप्न किनवट सारख्या भागामध्ये राहून सुद्धा पूर्ण होऊ शकत. ही बाब मातोश्री कमलताई ठमके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स या संस्थेने सिद्ध करून दाखवली आहे. २५ विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचमधील २ विद्यार्थ्यांची निवड होणे हे निश्चितपणे भविष्यातील सुंदर यशाची नांदी आहे. हे यावरून स्पष्ट होते. इन्स्टिट्यूट मधील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अद्यावत ज्ञान, सुसज्ज अभ्यासिका यामुळे हे शक्य झाले असे, मत गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त  करताना मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.फैयाज आलम,प्रा.नैहाल अहमद,प्रा.शेख शब्बीर प्रा.सुघोष चव्हाण, उप मुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर, पर्यवेक्षक प्रा.इंगळे आर.व्ही, किशोर डांगे, सुभाष सूर्यवंशी, चव्हाण पी.पी.यांनी परिश्रम घेतले.


  कार्यक्रमास नीट व जेईई या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी,पालक, परिसरातील नागरिक, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,हे मोठ्या संख्येने उपस्थित होते,सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष बैस ठाकूर यांनी केले तर आभार प्रा.सुबोध सर्पे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages